Header Ads Widget


राखी सावंतच्या लग्नात मोठा ट्विस्ट, 'बिग बॉस मराठी'मधल्या अभिनेत्रीसोबत आदिलचं अफेअर? सात महिन्यांपूर्वीच...

Rakhi Sawant marriage :राखी सावंत या ना त्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आली . घरातून बाहेर येताच तिनं चाहत्यांना धक्का दिला आहे. तिच्य लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मुंबई: ड्रामा क्विन राखी सावंत सध्या चर्चेत आलीये तिच्या लग्नामुळं. राखी सावंतनं बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत निकाह केल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या या निकाहचे म्हणजेच लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. राखीनं आता तिच्या लग्नाबद्दल आणि नवऱ्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. राखी आणि आदिलचा निकाह सात महिन्यांपूर्वीच झाला होता, असं तिनं सांगितलंय. खुद्द राखीनंच सात महिन्यांपूर्वी आदिलशी निकाह केल्याचं म्हटलंय. पण यात एका मोठा ट्विस्ट देखील आहे. आदिलनं आता निकाह झाल्याचं नाकारलंय.

का लपवलं दुसरं लग्न?
राखी दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतना म्हणाली की, आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. पण आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं. आम्ही कोर्टात लग्न केलंय. निकाह झालाय. आता आमचं लग्न सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे. कारण माझ्या आयुष्यात सध्या खूप काही घडत आहे. राखीनं आत्ताच लग्नाचे फोटो शेअर का केले असं विचारला असता ती म्हणाली की, कारण, तिला वाटतं की आदिलचं बिग बॉस मराठीमधील एका अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू आहे. म्हणून तिनं आता तिचं सिक्रेट लग्न सगळ्यांसमोर आणलं उघड केलं आहे.

आदिलनं राखीला लग्नाबद्दल बोलायचं नाही, असं सांगितलं होतं. पण राखीला आता वाटतंय की, त्याचं दुसऱ्या एका अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू आहे. त्यामुळं आता तिनं लग्न केल्याचं सांगून टाकलंय.

राखीच्या लव्ह लाइफची नेहमीच चर्चा होताना दिसते.राखीनं २०१९ मध्ये एनआरआय असणाऱ्या रितेशसोबत लग्न केलेलं. दोघे रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही दिसले होते, पण २०२२ मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचवर्षी राखी आणि आदिलने डेट करण्यास सुरुवात केली.

Post a Comment

0 Comments

Today is Saturday, April 12. | 10:59:45 AM