नंदुरबार ! Nandurbar/LivenationNews
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिक विभागाची पदवीधर मतदार संघ द्विवार्षिंक निवडणूक 2022-2023 च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नंदुरबार तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ नंदुरबार आचारसंहिता तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नाशिक विभाग पदवीधर निवडणूक प्रक्रियेमुळे नंदुरबार जिल्ह्यात आचारसंहिता घोषित झाली असून जिल्हास्तरावर 24x7 आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचार संहितेच्या उल्लघंनाबाबत आकस्मिक निरीक्षणासाठी जिल्हास्तरावर निवासी
उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्वरीत कार्यवाहीची टिम गठीत करण्यात आली असून नागरीकांनी आचारसंहिता तक्रारीबाबत दूरध्वनी क्रमांक 02564-210006 वर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सुधीर खांदे यांनी कळविले आहे.
0 Comments