Header Ads Widget


कोण होणार महाराष्ट्र केसरी 2023 ???

Live Nation News Bulletin
पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार सुरु आहे.  सेमीफायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील लढत चर्चेत आली आहे. 
यामध्ये सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियात व्यक्त केली आहे.  असे झाले कि महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील टागं हा डाव व्यवस्थीत झाला नव्हता. सिकंदर डेन्जर पोझिशनला नव्हता पण महेंद्रला चार गुण दिले गेले. अनेकांनी हा निर्णय चुकल्याचे बोललं आहे. जर हा निर्णय बरोबर दिला असता तर सिकंदर शेख विजयी झाला असता असं अनेकांनी म्हंटलं आहे. 
पण शेवटी पंचाचा निर्णय अंतिम असतो. 

        सोशल मीडियावर फक्त सिकंदर शेख च्या नावाची चर्चा जास्त होती. कारण त्याचा खेळही तसाच आहे ,आपल्या सर्व ताकतीनिशी आक्रमक खेळ करतो. संपूर्ण भारतामध्ये हरियाणा ,पंजाब ,कर्नाटक ,महाराष्ट्र कित्येक मोठमोठ्या पैलवानांना एक हाती चितपट करणारा ,त्यामध्ये हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी ,महान भारत केसरी ,असे कित्येक जण येतात .बऱ्यापैकी अनेक जणांना त्यानं चितपट केलेल आहे .
         सर्वसामान्य आणि हलाखीच्या परिस्थितीतून सोलापूर जिल्ह्यासारख्या ..मोहोळ तालुक्यातून एका हमालाचा पोरगा संपूर्ण भारतभर आपल्या नावाचा धुमाकूळ घालतो आहे. सोशल मीडियावर माती विभागांमध्ये आपण युट्युब वर व बाकीच्या सोशल मीडियावर पहा नाव जरी टाकलं तर ,अनेक कुस्त्या येतात. अशा या सिकंदर शेख चा महाराष्ट्र केसरी 2023 च्या माती विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पराभव झाला... परंतु हा पराभव नसून त्याने अनेकांची मने जिंकलेले आहेत....
         महाराष्ट्राचा यंदा कोण महाराष्ट्र केसरी होणार म्हणून युट्युब वरती मतदान घेण्यात आलं त्यामध्ये 26000 लोकांनी मतदान नोंदवलं,त्याच्यामध्ये 65 टक्के लोकांना वाटलं यंदाचा महाराष्ट्र केसरी  सिकंदर शेख होईल....
पराभवाने खचून न जाता भविष्यकाळातील विजयासाठी जोरदार प्रयत्न करून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करशील या शुभेच्छा देतो......

Post a Comment

0 Comments

|