Header Ads Widget


साक्रीच्या सि.गो.पाटील महाविद्यालयातील १८ गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना "आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक" योजनेअंतर्गत एक लाख सहा हजार रुपयाचा धनादेश दिले...


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयात नियमित प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदतीच्या विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी गरजू, होतकरू, आणि हुशार विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज सादर करून योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले.

         कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या विद्यार्थी विकास विभागा मार्फत सी. गो. पाटील महाविद्यालय साक्री येथील 18  विद्यार्थ्यांची निवड  "आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य" योजनेसाठी करण्यात आली होती. त्यांना आज विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांच्या उपस्थितीत धनादेश देऊन संबंधितांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली. मिळालेल्या पैशांचा सदुपयोग चांगल्या अशा शैक्षणिक कामासाठी करावा. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या उपयुक्त अशा योजनेचे महत्व प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
         
   सी. गो. पाटील महाविद्यालयास प्राप्त झालेल्या 18 गरजू विद्यार्थ्यांचे अर्थसहाय्य्य रु.106000/- ( एक लाख सहा हजार ) धनादेशाद्वारे  संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यावेळी गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलून दिसत होता. 

        सदर योजनेचा लाभ मिळावा यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विद्यार्थी विकास विभागाकडे या गरजू विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे अर्ज दाखल केले होते. यासाठी ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे आई किंवा वडील मयत झाले असतील, किंवा त्यांच्या पालकांचे उत्पन्न अत्यल्प असेल अशा संवर्गनिहाय, दिव्यांग इ. निकषानुसार मुला मुलींना उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ आर्थिक मदत देत असते. याचा फायदा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी होत असतो. सी. गो. पाटील महाविद्यालय साक्रीच्या 18 विद्यार्थी-विद्यार्थिनींना एक लाख सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य्य आज त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. यात पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6500/ रुपये, आकरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6000/-  एका विद्यार्थ्याला 4000/- आणि एका विद्यार्थिनीला 3500/- असे एक लाख सहा हजार रुपये अर्थसहाय्य  वाटप करण्यात आले.

      ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या योजनेचा आर्थिक लाभ मिळाल्यामुळे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल.माहेश्वरी, प्र. कुलगुरू प्रोफेसर डॉ. एस.टी. इंगळे, रजिस्ट्रार डॉ. विनोद पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांचे साक्री येथील विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश पाटील, अध्यक्षा मंगलाताई पाटील, उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. डी. एल. तोरवणे, प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी. डॉ. लहू पवार,सहा. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. पंकज अहिरे, डॉ. ज्योती वाकोडे आदींनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments

|